साखर कारखान्यांनी इथेनॉल व सहवीज निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा- मुख्यमंत्री
04 February 18:57

साखर कारखान्यांनी इथेनॉल व सहवीज निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा- मुख्यमंत्री


साखर कारखान्यांनी इथेनॉल व सहवीज निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा- मुख्यमंत्री

कृषिकिंग, सातारा: ऊस हे शाश्वत पीक असून यापुढे कारखान्याच्या विस्तारासाठी मागणी करणाऱ्यांना इथेनॉल तयार करण्याची अट घालण्यात येईल. पेट्रोल-डिझेलला इथेनॉल हे पर्याय ठरले तर आपले परकीय चलन वाचेल. किसनवीर खंडाळा सहकारी साखर उद्योगाने घेतलेला पुढाकार इतरांसाठी अनुकरणीय असल्याचे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहे.

किसन वीर खंडाळा सहकारी साखर उद्योगच्या साखर पोती पूजन, सह वीजनिर्मिती लोकार्पण व शेतकरी मेळाव्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर हेही उपस्थित होते.

साखर कारखाने व शेतकऱ्यांच्या पाठिशी शासन भक्कमपणे आहे. किसन वीर खंडाळा साखर कारखान्याला येत्या २ दिवसात ईथेनॉलबाबत परवानगी देण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहे. याशिवाय भविष्यात ऊस काढणीसाठी हार्वेस्टरचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागेल. त्यासाठी ४० लाखाचे अनुदान देणारी योजना शासनाने तयार केली आहे. साखर उद्योग हा शाश्वत म्हणून ओळखला जातो. त्यासाठी बाजार त्यांच्या हातात हवा. राज्य शासनाच्या प्रयत्नातून ९९ टक्के एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. तसेच कारखान्यांना विशेष पॅकेज दिले आहे. सहकारी बँकामार्फत कर्ज देण्यासाठी प्रयत्न केला गेला. असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.टॅग्स

संबंधित बातम्या