पिक विम्यासाठी ऑफलाईन अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई देणार- महसूलमंत्री
31 January 18:17

पिक विम्यासाठी ऑफलाईन अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई देणार- महसूलमंत्री


पिक विम्यासाठी ऑफलाईन अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई देणार- महसूलमंत्री

कृषिकिंग, मुंबई: "प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०१७ योजनेअंतर्गत मुदतवाढीच्या काळात ऑफलाईन पद्धतीने अर्ज केलेल्या ८६ हजार ७४८ पात्र शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई देण्याचे अमान्य केले होते. या शेतकऱ्यांना राज्याच्या निधीतून सुमारे ६९.४८ कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे." अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०१७ साठी विदर्भातील शेतकऱ्यांच्या सहभागासाठी केंद्र शासनाने ४ ऑगस्ट २०१७ पर्यंत मुदत दिली होती. मात्र, ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास शक्य झाले नाही, अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाने ५ ऑगस्ट २०१७ पर्यंत एक दिवसाची मुदत वाढवून दिली होती. या एक दिवसात एकूण १ लाख ६ हजार २६५ शेतकऱ्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केले होते. त्यापैकी ८६ हजार ७४८ इतके शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरले होते. या शेतकऱ्यांना पिक विमा भरपाई पोटी देय असलेली रक्कम विमा कंपन्यांनी तांत्रिक कारणास्तव देण्यास नकार दिला होता. या शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि त्यांना समान न्याय मिळावा यासाठी राज्‍य शासनाने ही ६९.४८ कोटी रुपयांची रक्कम राज्याच्या निधीतून देण्याचा निर्णय घेतला. असे पाटील यांनी सांगितले आहे.



संबंधित बातम्या