महाराष्ट्रानंतर आता उत्तरप्रदेशातील शेतकरी साखर आयुक्तांना घेराव घालणार
02 February 13:00

महाराष्ट्रानंतर आता उत्तरप्रदेशातील शेतकरी साखर आयुक्तांना घेराव घालणार


महाराष्ट्रानंतर आता उत्तरप्रदेशातील शेतकरी साखर आयुक्तांना घेराव घालणार

कृषिकिंग, नवी दिल्ली: "२०१८-१९ च्या चालू गाळप हंगामाच्या पहिल्या चार महिन्यांमध्ये (ऑक्टोबर ते जानेवारी) देशभरातील ऊस उत्पादकांची थकबाकीची ११ हजार ९०० कोटींवर पोहचली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. उत्तरप्रदेशातील ऊस उत्पादक शेतकरी थकबाकी मिळवी यासाठी १५ फेब्रुवारीला साखर आयुक्त कार्यालयाला घेराव घालणार आहे." अशी माहिती राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे संयोजक वी एम सिंह यांनी दिली आहे.

दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी (२८ जानेवारी) रोजी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे साखर संकुलावर मोर्चा काढला होता. यावेळी महाराष्ट्र साखर आयुक्तांनी कारखान्यांवर योग्य ती कारवाई कारवाई करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर थकबाकी दिली जाईल. असे आश्वासन दिल्यानंतर हा विराट मोर्चा मागे घेण्यात आला.

उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांची थकबाकी जवळपास ६ हजार कोटींपर्यंत पोहचली आहे. यामध्ये ५ हजार ४०० कोटी रुपये थकबाकी ही यावर्षीच्या हंगामातील तर १ हजार २०० कोटी रुपये थकबाकी ही मागील हंगामातील आहे. तर महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे सध्यस्थितीत शेतकऱ्यांची ५ हजार ३०० कोटींची थकबाकी शिल्लक आहे.टॅग्स

संबंधित बातम्या