लोकसभा निवडणुकीआधी हरियाणा सरकार शेतकऱ्यांना पेन्शन देणार
31 January 08:30

लोकसभा निवडणुकीआधी हरियाणा सरकार शेतकऱ्यांना पेन्शन देणार


लोकसभा निवडणुकीआधी हरियाणा सरकार शेतकऱ्यांना पेन्शन देणार

कृषिकिंग, हरियाणा: हरियाणा सरकारने भारतीय जनता पक्षाने (भाजपा) लोकसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांना पेन्शन देण्याची योजना तयार केली आहे. हरियाणाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पेन्शनसाठीचा आराखडा तयार केला आहे. तसेच कृषी संशोधक, प्रगतिशील शेतकरी, आणि महिला शेतकऱ्यांसोबत चर्चा करून याबाबत अंतिम अहवाल तयार केला जाणार आहे.

चंदीगड येथे झालेल्या समितीच्या तिसऱ्या बैठकीनंतर बराला यांनी सांगितले आहे की, समितीकडून योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र, लवकरच बाकी असलेल्या मुद्द्यावर चर्चा करून, अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवला जाणार आहे.

राज्यात जवळपास १६ लाख शेतकरी आणि २६ लाख शेतमजूर आहेत. ६० वर्षांवरील सर्व शेतकऱ्यांना शेतकरी पेन्शन योजना लागू केली जाणार आहे. सध्यस्थितीत हरियाणामध्ये जेष्ठ नागरिकांना २००० रुपये पेन्शन मिळत आहे. त्यामध्येच २ ते ३ हजार रुपये जोडून शेतकऱ्यांना ४ ते ५ हजार रुपये पेन्शन देण्याचा हरियाणा सरकारचा विचार आहे. अशी माहितीही बराला यांनी दिली आहे.संबंधित बातम्या