दुष्काळ निवारणासाठीच्या उर्वरित निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार- चंद्रकांत पाटील
30 January 12:31

दुष्काळ निवारणासाठीच्या उर्वरित निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार- चंद्रकांत पाटील


दुष्काळ निवारणासाठीच्या उर्वरित निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार- चंद्रकांत पाटील

कृषिकिंग, मुंबई: "महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने ४ हजार ७१४ कोटींची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकारने मागितलेल्या मदतीचा हा पहिला टप्पा असून उर्वरित निधी मिळण्यासाठी राज्य सरकार पाठपुरावा करणार आहे. दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असून, प्रसंगी राज्याच्या निधीतून मदत केली जाईल," अशी ग्वाही महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

दुष्काळ निवारणासाठी जी मदत केंद्राने महाराष्ट्राला दिली. ती आजपर्यंतची सर्वाधिक मदत आहे. मदतीचा हा पहिला टप्पा असून आणखी मदत देण्यासाठी केंद्र शासन सकारात्मक आहे. त्यामुळे उर्वरित सुमारे २ हजार २०० कोटी मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार आहोत. असेही ते म्हणाले आहे.

केंद्राच्या निकषात न बसणारी जी मंडळे व गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली आहे. त्यांना राज्य शासनाच्या निधीतून मदत केली जाणार आहे. त्यासाठी किती निधी लागणार आहे. त्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले आहे.संबंधित बातम्या