शेतकरी उत्पादक कंपन्यांना गोदामे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन- सहकारमंत्री
29 January 18:37

शेतकरी उत्पादक कंपन्यांना गोदामे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन- सहकारमंत्री


शेतकरी उत्पादक कंपन्यांना गोदामे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन- सहकारमंत्री

कृषिकिंग, मुंबई: राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्याना शेतमाल साठवणूक आणि शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी पणन महामंडळ, वखार महामंडळची गोदामे मिळण्याची मागणी शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींनी केली आहे. या गोदामांच्या स्थितीचा आढावा घेऊन ती शेतकरी उत्पादक कंपन्यांना वापरण्यासाठी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे," असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज (मंगळवार) सांगितले आहे.

आज मंत्रालयात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी पणन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी विकास शिंदे, योगेश थोरात, डॉ. हनुमंत वाडेकर, पणन विभागाचे अधिकारी व शेतकरी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यातील विविध महामंडळांकडे गोदामे उपलब्ध आहेत. परंतु त्यांची स्थिती सुधारण्याची गरज आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा सहकारी संस्थांच्या गोदामांची पाहणी करून शेतकरी उत्पादन कंपन्यांच्या जवळपास आणि त्यांच्या सोयीचे गोदामे वितरित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असेही देशमुख यांनी सांगितले आहे.

राज्यात १७०० शेतकरी उत्पादक कंपन्या तयार झाल्या आहेत. त्यांच्याकडून शेतमालाची साठवणूक करण्यासाठी शासनाच्या ताब्यातील रिक्त गोदामांची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी पूर्ण झाल्यास शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रत्यक्षात उद्योग सुरू करण्यासाठी मदत होईल, असेही देशमुख म्हणाले आहे.संबंधित बातम्या