भाजप नेत्याची शेतकरी कुटुंबाला अमानुष मारहाण
29 January 10:32

भाजप नेत्याची शेतकरी कुटुंबाला अमानुष मारहाण


भाजप नेत्याची शेतकरी कुटुंबाला अमानुष मारहाण

कृषिकिंग, जालना: भाजपच्या किसान आघाडीच्या जिल्हाध्यक्षाने एका शेतकरी कुटुंबाला अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाहीतर या शेतकरी कुटुंबाला खड्ड्यात टाकून जेसीबीच्या साहाय्याने खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही या शेतकरी कुटुंबाने केला आहे. विशेष म्हणजे जालन्यामध्ये भाजप कार्यकारिणीची बैठक सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडला.

भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब भवर यांनी निवडुंगा येथील शेतकरी ज्ञानेश्वर खांडेभारड यांच्या शेतात विहिरी खोदण्यासाठी जेसीबी मशीन आणला होता. आपल्या शेतात अचानकपणे जेसीबी मशीन आणल्यामुळे या कुटुंबाने त्यांना विरोध केला. त्यामुळे भवर आणि त्यांच्या समर्थकांनी या कुटुंबाला जबर मारहाण केली. भवर यांनी खांडेभारड यांच्या कुटुंबातील महिलांना देखील मारहाण केली.

या घटनेनंतर खांडेभारड कुटुंबांनी पोलिसांत धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही. जालन्यात भाजपची कार्यकारिणी आयोजित करण्यात आली असून, या कार्यकारिणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच वरीष्ठ नेते हजर आहेत.संबंधित बातम्या