थकीत एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानीचा पुण्यात विराट मोर्चा
28 January 19:03

थकीत एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानीचा पुण्यात विराट मोर्चा


थकीत एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानीचा पुण्यात विराट मोर्चा

कृषिकिंग, पुणे: ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झालेली पाहायला मिळाली. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज (सोमवार) पुण्यातील अलका चौक ते साखर संकुल येथे मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात स्वराज इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव हे देखील उपस्थित होते, तसेच राज्यातील विविध भागातील शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्याची एफआरपी प्रश्नावर फसवणूक केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी वेळ पडल्यास राज्याची तिजोरीही खाली करू अशी घोषणा केली होती. त्या मुख्यमंत्र्यांचा आम्ही आता शोध घेत आहोत, अशा शब्दांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर यावेळी निशाणा साधला आहे. तसेच सहकारमंत्री भामटा आणि चोर असून या चोराच्या हाती तिजोरीच्या चाव्या आहेत, अशा शब्दात त्यांनी सहकार मंत्र्यांचाही खरपूस समाचार घेतला आहे.

यावेळी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची मागणी कित्येक महिन्यांपासून प्रलंबित आहे. अशा साखर कारखानदारांवर सरकारने कारवाई करावी ही मागणी कित्येक वेळा केली. मात्र अद्याप सरकारने कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही. यामुळे आज मोर्चा काढला असून या मोर्चाची दखल न घेतल्यास आणखी तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.



संबंधित बातम्या