उसाचा रस झाला पाकिस्तानचा 'नॅशनल ज्यूस'; ट्विटर पोलमध्ये ८१ टक्के मतदान
28 January 15:55

उसाचा रस झाला पाकिस्तानचा 'नॅशनल ज्यूस'; ट्विटर पोलमध्ये ८१ टक्के मतदान


उसाचा रस झाला पाकिस्तानचा 'नॅशनल ज्यूस'; ट्विटर पोलमध्ये ८१ टक्के मतदान

कृषिकिंग, इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने नुकताच ट्विटर वर 'नॅशनल ज्यूसा साठी पोल घेतला. त्यात 'उसाच्या रसाला' पाकिस्तानी जनतेने सर्वाधिक मतदान केले. याबाबतचे अधिकृत वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे.

पाकिस्तान सरकारने जनतेचे मत घेण्यासाठी ट्विटर वर पोल ठेवला होता. त्यात पाकिस्तानचा 'नॅशनल ज्यूस' कोणता असावा याकरिता 'उसाचा रस, 'गाजराचा रस', आणि 'संत्र्याच्या रस' असे तीन पर्याय दिले होते. पाकिस्तानी जनतेने उसाच्या रसाला ८१ टक्के बहुमत (७६१६) मिळाली. संत्र्याच्या रसाला १५ टक्के, तर गाजराच्या रसाला ४ टक्के नागरिकांनी पसंती दिली. हा पोल, २४ जानेवारी रोजी पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर घेण्यात आला होता.

उसाच्या उत्पादनात पाकिस्तानचा जगात ५वा क्रमांक आहे. ब्राझील, भारत, चीन आणि थायलंड अनुक्रमे १, २, ३ आणि चार क्रमांकावर आहेत. पाकिस्तानचे मागील वर्षीचे साखरेचे उत्पादन ६८ लक्ष मे. टन. होते आणि यावर्षीच्या हंगामात त्यात ५ लक्ष मे. टन घट होण्याची शक्यता आहे.संबंधित बातम्या