गेल्या १० वर्षात राज्यातील २३ हजार ६३८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
26 January 13:00

गेल्या १० वर्षात राज्यातील २३ हजार ६३८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या


गेल्या १० वर्षात राज्यातील २३ हजार ६३८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

कृषिकिंग, मुंबई: राज्यात शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच असून, गेल्या १० वर्षात दोन वेळा कर्जमाफी मिळाली, सत्ता बदलही झाला, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही केल्या थांबलेल्या नाहीत.

गेल्याच आठवड्यात नाशिक जिल्ह्यात कांद्याला भाव मिळत नसल्याने एकाच दिवशी २४ तासात ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले होते. मेक इन महाराष्ट्रसारखी योजना, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन असे प्रकल्प राबवले जाणाऱ्या महाराष्ट्रात प्रजासत्ताक दिनाच्या ८ दिवसांपूर्वी या तरुण शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपवणे, हे चित्र नक्कीच भूषणावह नाही.

सरकारी आकडेवारीनुसार २००८ मध्ये राज्यात १,९६६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी १,२७९ शेतकऱ्यांचे कुटुंबीय मदतीसाठी अपात्र ठरले. म्हणजेच फक्त ३८ टक्के आत्महत्याग्रस्त कुटुंब मदतीसाठी पात्र ठरले. २०१३ मध्ये १२९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी ६२९ कुटुंबीय मदतीसाठी अपात्र ठरले. तर २०१८ साली २७६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी १०५० शेतकऱ्यांचे कुटुंबीय मदतीसाठी अपात्र ठरले. अशी माहिती राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या अहवालातून समोर आली आहे.

गेल्या १० वर्षातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण
२०१८ – २, ७६१

२०१७ – २, ९७१

२०१६ – ३, ०६३

२०१५ – ३, २६३

२०१४ – १,९८१

२०१३ – १, २९६

२०१२ – १,४७३

२०११ – १,५१८

२०१० – १, ७४१

२००९ – १,६०५

२००८ – १,९६६टॅग्स

संबंधित बातम्या