शेतकऱ्यांसाठी लवकरच मदत निधी पॅकेजची घोषणा होणार- रुपाला
24 January 18:40

शेतकऱ्यांसाठी लवकरच मदत निधी पॅकेजची घोषणा होणार- रुपाला


शेतकऱ्यांसाठी लवकरच मदत निधी पॅकेजची घोषणा होणार- रुपाला

कृषिकिंग, नवी दिल्ली: देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून लवकरच मदत निधी पॅकेजची घोषणा केली जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तांना केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरूषोत्तम रुपाला यांनी आज अधिकृतरित्या दुजोरा दिला आहे. लवकरच शेतकऱ्यांसाठी विशेष मदत निधी पॅकेजची घोषणा केली जाणार आहे. असे सांगितले आहे. आज कृषी समर कॅम्पनेच्या नेशनल कॉन्फ्रेंसमध्ये बोलताना ही माहिती दिली आहे. मात्र, त्यांनी याबाबत अधिक माहिती देणे टाळले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून समोर येत असलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वार्षिक १५ हजार रुपयांचे भांडवल देणार आहे. याशिवाय एक लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज हे शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध करून देण्यासोबतच पीक विमा योजनेसाठीच्या प्रीमियम दरात कपात केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार शेतकऱ्यांची नाराजी दूर करू इच्छित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी लवकरच मदत निधी पॅकेजची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.संबंधित बातम्या