अमेठीत राहुल गांधीविरोधात शेतकऱ्यांचे विरोध प्रदर्शन; वाचा काय आहे बातमी
24 January 14:26

अमेठीत राहुल गांधीविरोधात शेतकऱ्यांचे विरोध प्रदर्शन; वाचा काय आहे बातमी


अमेठीत राहुल गांधीविरोधात शेतकऱ्यांचे विरोध प्रदर्शन; वाचा काय आहे बातमी

कृषिकिंग, अमेठी(उत्तरप्रदेश): काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात त्यांच्याच मतदारसंघातील शेतकऱ्यांनी विरोध प्रदर्शन केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर कालपासून (बुधवार) राहुल गांधी दोन दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर आहेत. या शेतकऱ्यांनी त्यांना विरोध करण्यासोबतच 'राहुल गांधी शर्म करो, हमारी जमीन वापस करो', 'इटलीला परत जा,' अशा आशयाच्या घोषणाही दिल्या आहेत.

अमेठी जिल्ह्यातील या शेतकऱ्यांनी सांगितले आहे की, राजीव गांधी फाउंडेशनला देण्यात आलेली जमीन परत देण्यात यावी. किंवा त्याऐवजी रोजगार उपलब्ध करून द्यावा. अशी आमची मागणी आहे. शेतकरी संजय सिंह यांनी सांगितले आहे की, आम्ही राहुल गांधींवर प्रचंड नाराज आहोत. त्यांनी इटलीला परत जावं. त्यांनी आमच्या जमिनीवर कब्जा केला आहे.

या शेतकऱ्यांनी सम्राट सायकल कंपनीच्या समोर आंदोलन केले आहे. या कंपनीचे उदघाटन तत्कालीन खासदार आणि पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी केले होते. त्यावेळी ते अमेठीचे खासदार होते. १९८० साली जैन बंधूंनी कंपनी सुरु करण्यासाठी ६५.६७ एकर जमीन खरेदी केली होती. मात्र, ही कंपनी अयशस्वी ठरल्यानंतर २०१४ मध्ये या जमिनीचा लिलाव करण्यात आला होता.

सरकारी रेकॉर्डच्या माहितीनुसार, यूपी स्टेट इंडस्ट्रियल डिवेलपमेंट कॉरपोरेशनने १९८६ मध्ये ही जमिन कंपनीला दिली होती. मात्र, नंतर ही कंपनी बंद झाल्यानंतर २०१४ मध्ये ही जमिन २०.१० कोटींना विक्री करण्यात आली. तेव्हापासून या जमिनीचे कागदपत्र यूपी स्टेट इंडस्ट्रियल डिवेलपमेंट कॉरपोरेशनकडे आहेत. मात्र, या जमिनीवर राजीव गांधी चैरिटेबल ट्रस्टचा कब्जा आहे.संबंधित बातम्या