शेतकऱ्यांची साखर विकत घेऊन शेट्टींनी पैसे द्यावेत
24 January 11:44

शेतकऱ्यांची साखर विकत घेऊन शेट्टींनी पैसे द्यावेत


शेतकऱ्यांची साखर विकत घेऊन शेट्टींनी पैसे द्यावेत

कृषिकिंग, सांगली: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा.राजू शेट्टी यांनी ‘एफआरपी’च्या कमी पडणाऱ्या रकमेची साखर मागितली आहे. शेतकऱ्यांकडे गरजेपेक्षा जादा साखर उपलब्ध होईल, त्यामुळे शेतकऱ्यांची साखर शेट्टींनी विकत घेऊन पैसे द्यावेत, असे मत शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले, अजित नरदे यांनी व्यक्त केले आहे.

शेट्टींचे आंदोलन म्हणजे नाटक असून, ते शेतकऱ्यांनाही मान्य नाही. कारखान्यांना एफआरपीसाठी जेवढे पैसे कमी पडतात. त्या रकमेची साखर द्यावी, असा प्रस्ताव शेट्टी साखर आयुक्तांकडे ठेवणार आहेत. एकाचवेळी हजारो शेतकऱ्यांना गरजेपेक्षा जादा साखर मिळेल. ही मागणी दिशाभूल करणारी आहे. असेही ते म्हणाले आहे.टॅग्स

संबंधित बातम्या