पंजाब सरकारकडून साखर कारखान्यांसाठीच्या ६५ कोटींच्या सहायता निधीला मंजुरी
24 January 08:30

पंजाब सरकारकडून साखर कारखान्यांसाठीच्या ६५ कोटींच्या सहायता निधीला मंजुरी


पंजाब सरकारकडून साखर कारखान्यांसाठीच्या ६५ कोटींच्या सहायता निधीला मंजुरी

कृषिकिंग, चंदीगड: "पंजाब सरकारने राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी ६५ कोटींच्या सहायता निधीला मंजुरी दिली आहे. कारखाने या निधीचा उपयोग २०१७-१८ च्या गाळप हंगामातील शेतकऱ्यांची थकबाकी देण्यासाठी करू शकणार आहे. ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे." अशी माहिती पंजाबचे सहकारमंत्री एस. सुखजिंदर सिंह रंधावा यांनी दिली आहे.

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची १५१.३३ कोटींची थकबाकी शिल्लक आहे. या थकबाकीसाठी पंजाब सरकारने ६५ कोटींचा निधी मंजुरी केला आहे. त्यानंतर आता उर्वरित ८६.३३ कोटींची निधीही शेतकऱ्यांना लवकरच दिला जाईल. अशी माहितीही एस. सुखजिंदर सिंह रंधावा यांनी दिली आहे.

२०१८-१९ च्या गाळप हंगामात पंजाबमधील कारखान्यांनी २१ जानेवारीपर्यंत ९९.१५ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. तर सध्यस्थितीत पंजाबमध्ये ९.४० टक्के साखर उतारा होत आहे. पंजाबमधील कारखाने शेतकऱ्यांकडून पंजाब सरकारने ठरवून दिलेल्या ३१० रुपये प्रति क्विंटल दराने ऊस खरेदी करत आहे.टॅग्स

संबंधित बातम्या