'शेतकऱ्यांसाठी विना अट रोख रक्कम हस्तांतरण योजना' हाच उत्तम पर्याय- एसबीआय
23 January 15:08

'शेतकऱ्यांसाठी विना अट रोख रक्कम हस्तांतरण योजना' हाच उत्तम पर्याय- एसबीआय

'शेतकऱ्यांसाठी विना अट रोख रक्कम हस्तांतरण योजना' हाच उत्तम पर्याय- एसबीआय

कृषिकिंग, नवी दिल्ली: "कृषी क्षेत्रातील समस्या कमी करण्यासाठी केंद्र सरकारने युनिवर्सल बेसिक इन्कम योजना लागू करण्याऐवजी शेतकऱ्यांना भांडवलासाठी विना अट रोख रक्कम हस्तांतरण योजना लागू करावी." असे भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) आपल्या प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे.

‘इकोरैप’ या शीर्षकाखाली प्रकाशित करण्यात आलेल्या आपल्या अहवालात एसबीआयने म्हटले आहे की, "सध्यस्थितीत राष्ट्रीय स्तरावर रायतू बंधू योजना लागू करणे अवघड आहे. कारण झारखंड, बिहार, गुजरात आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये जमिनीची आकडेवारी आतापर्यंत डिजिटल स्वरूपात उपलब्ध नाही. त्यामुळे रायतू बंधू योजनेची या राज्यांमध्ये अंमलबजावणी करणे अवघड ठरणार आहे. त्याऐवजी विना अट शेतकऱ्यांना भांडवलासाठी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना लागू करावी."संबंधित बातम्या