कोकणातले शेतकरी आत्महत्या करत नाही, याचा अभिमान वाटतो- महाजन
23 January 14:31

कोकणातले शेतकरी आत्महत्या करत नाही, याचा अभिमान वाटतो- महाजन


कोकणातले शेतकरी आत्महत्या करत नाही, याचा अभिमान वाटतो- महाजन

कृषिकिंग, रत्नागिरी: "कोकणातले शेतकरी आत्महत्या करत नाहीत, याचा अभिमान वाटतो." असे वक्तव्य लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील व्याडेश्वर मंदिरात सुमित्रा महाजन दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

कोकणाताली माणसं कष्टकरी असून, ते गरीबीत दिवस काढतील. मात्र आत्महत्या करणार नाही. परिस्थितीवर मात करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद कोकणच्या माणसात आहे. याचा मला अभिमान आहे. असेही त्या यावेळी म्हणाल्या आहे.

कोकणातल्या तरूणांनी आता पुढे येत काम करण्याची आवश्यकता आहे. कोकणचा विकास करायचा असेल तर सर्व पक्ष, जाती-भेद बाजूला ठेवून तुम्ही एकत्र या. त्यासाठी देशाच्या पातळीवर जे सहकार्य लागेल ते देण्यास मी तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे. निवडणुका जवळ आल्या असल्या तरीही मी येणाऱ्या सरकारच्या काळातही कोकणाच्या विकासासाठी निश्चित प्रयत्न करेन. असेही महाजन यांनी यावेळी सांगितले आहे.संबंधित बातम्या