राज्यात आजपर्यंत ५६८ लाख टन उसाचे गाळप; ६०.८२ लाख टन साखर उत्पादन
23 January 12:06

राज्यात आजपर्यंत ५६८ लाख टन उसाचे गाळप; ६०.८२ लाख टन साखर उत्पादन


राज्यात आजपर्यंत ५६८ लाख टन उसाचे गाळप; ६०.८२ लाख टन साखर उत्पादन

कृषिकिंग, पुणे: सध्यस्थितीत राज्यातील १९१ साखर कारखान्यांनी आपले गाळप सुरु केले आहे. या कारखान्यांनी दैनंदिन ७ लाख टनांच्या गाळप क्षमतेने आतापर्यंत ५६८ लाख टन उसाचे गाळप केले आहे. या ऊस गाळपातून ६०.८२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. सध्या राज्याचा साखर उतारा सरासरी १०.७० टक्के आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा साखर उतारा ०.१५ टक्‍क्‍याने अधिक मिळत आहे.

मागील वर्षी याच कालावधीत १८२ साखर कारखाने आपले गाळप सुरु केले होते. या १८२ कारखान्यांनी दैनंदिन ६.६४ लाख टन उसाचे गाळप केले होते. तर मागील वर्षी याच कालावधीत या कारखान्यांनी ५०३ लाख टन उसाचे गाळप करून, ५३.१४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. मागील वर्षी १०.५५ टक्के इतका साखर उतारा मिळाला होता. यावर्षी थंडीचे प्रमाण वाढल्याने व पावसाने दिलेल्या ताणामुळे साखर उताऱ्यात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.

ऊस गाळपात राज्यात पुणे विभाग आघाडीवर आहे. तर कोल्हापूर विभागाने साखर उताऱ्यातील आपली आघाडी कायम ठेवली आहे. कोल्हापूर विभागात सध्या राज्यातील सर्वाधिक ११.८७ टक्के साखर उतारा मिळत आहे.टॅग्स

संबंधित बातम्या