देशभरातील कारखान्यांकडे शेतकऱ्यांची १९ हजार कोटींची थकबाकी
23 January 08:30

देशभरातील कारखान्यांकडे शेतकऱ्यांची १९ हजार कोटींची थकबाकी


देशभरातील कारखान्यांकडे शेतकऱ्यांची १९ हजार कोटींची थकबाकी

कृषिकिंग, पुणे: चालू गाळप हंगामात साखरेचे उत्पादन ३०७ लाख टनांपर्यंत घटणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या कमी होण्याऐवजी त्यात अजूनच वाढ होण्याची शक्यता आहे. देशभरातील कारखान्यांकडे शेतकऱ्यांची मागील वर्षाची थकबाकी शिल्लक आहे. त्यातच यावर्षीच्या चालू गाळप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर उसाचे पैसे न मिळाल्याने त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

३१ डिसेंबर २०१८ पर्यंत देशभरातील कारखान्यांकडे शेतकऱ्यांची १९ हजार कोटींची थकबाकी शिल्लक आहे. (यामध्ये मागील वर्षीच्या २ हजार ८०० कोटींच्या थकबाकीचा समावेश आहे.) जी मागील वर्षीच्या याच कालावधीतील १० हजार ६०० कोटींपेक्षा ८ हजार ४०० कोटींनी अधिक आहे.टॅग्स

संबंधित बातम्या