यावर्षी ३०७ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता- इस्मा
22 January 12:40

यावर्षी ३०७ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता- इस्मा


यावर्षी ३०७ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता- इस्मा

कृषिकिंग, पुणे: "चालू हंगामात देशभरात सुमारे ३०७ लाख टन इतके साखरेचे उत्पादन होईल," असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्‍त केला आहे.

महाराष्ट्रात यावर्षी २० जानेवारीपर्यंत ५६८ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून ६०.८२ लाख टन साखरेचे उत्पादन घेण्यात आले आहे. ‘इस्मा’च्या अंदाजानुसार, यावर्षी महाराष्ट्रात ९५ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. मागील वर्षीच्या हंगामात महाराष्ट्राने १०७.२३ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. याशिवाय उत्तर प्रदेशातील ११७ कारखान्यांनी ३८२ लाख टन उसाचे गाळप करून ४२ लाख टन साखरेची निर्मिती केली आहे. कर्नाटकात यावर्षी ४२ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. १५ जानेवारीपर्यंत कर्नाटकने २६.७६ लाख टन साखरेची निर्मिती केली आहे.

जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उपग्रहांच्या मदतीने छायाचित्रे घेण्यात आली. त्यानुसार ‘इस्मा’ने चालू हंगामात शेतातील उसाचे क्षेत्र आणि साखरेच्या उत्पादनाचा हा अंदाज व्यक्‍त केला आहे.

केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर भर देत, इथेनॉलच्या दरात मोठी वाढ केल्यामुळे अनेक कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनावर भर दिला आहे. परिणामस्वरूप, यावर्षी साखरेच्या उत्पादनात ५ लाख टनांनी घट होणार आहे. परिणामी, अतिरिक्‍त साखरेचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटणार असल्याचे साखर उद्योगातील जाणकारांचे म्हणणे आहे.टॅग्स

संबंधित बातम्या