पुण्यात शुक्रवारपासून 'समर्थाज्' घरोघरी दूध पोहचवणार
22 January 12:06

पुण्यात शुक्रवारपासून 'समर्थाज्' घरोघरी दूध पोहचवणार


पुण्यात शुक्रवारपासून 'समर्थाज्' घरोघरी दूध पोहचवणार

कृषिकिंग, पुणे: मुंबई, पुणे सारख्या राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये शेतकरी आठवडे बाजार भरवणारी 'श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनी' आता पुण्यात घरोघरी दूध पोहचवण्याचे काम करणार आहे. २५ जानेवारीपासून पुणेकरांसाठी कंपनीकडून ही सेवा सुरु केली जाणार आहे.

अलिकडेच, शेतकऱ्यांच्या शेतातून थेट ग्राहकांच्या घरापर्यंत शेतमाल पोचवण्यासाठी कंपनीने काम सुरू केले आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात दूधापासून सुरवात करण्यात आली आहे. मुंबईतील डबेवाल्यांच्या व्यवस्थापानाच्या धर्तीवर लहान एक-दोन लिटरच्या कॅनमधून दूध पुरवठा केला जाणार असून, प्रत्यक्षात काम देखील सुरू झाले आहे. विशेष म्हणजे ग्राहकांसाठी ट्रेसॅबिलिटीची सुविधा कंपनीकडून उपलब्ध होणार आहे.

पुणे विभागातील असंख्य लहानमोठ्या गोठेधारक शेतकऱ्यांचे बॅकवर्ड इंटिग्रेशन करून हा संपूर्ण व्यवसाय एका संघटित व व्यावसायिक यंत्रणेद्वारा राबवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. पुढे हेच मॉडेल थेट भाजीपाला व अन्नधान्य पुरवठ्यात राबवण्याचा कंपनीचा मानस आहे.

'श्री स्वामी समर्थ' शेतकरी उत्पादक कंपनीविषयी:
सर्वच शेतकऱ्यांनी केवळ माल पिकवू नये, तर काहींनी आता व्यापारी बनावे, ही संकल्पना लक्षात घेऊन मागील पाच वर्षांत शेतकरी आठवडे बाजाराची संकल्पना 'श्री स्वामी समर्थ' शेतकरी उत्पादक कंपनीने यशस्वीपणे रुजवली आहे. आजघडीला कंपनीद्वारे होणारी वार्षिक विक्री शंभर कोटींवर पोचली आहे. सुमारे ४५० सभासद आणि पाच हजारावर शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुण्या-मुंबईत २४ ठिकाणी आठवडे बाजाराच्या माध्यमातून थेट शेतमाल विक्री सुरू आहे. कंपनीचे प्रमुख कारभारी नरेंद्र पवार, गणेश सवाने, तुषार अग्रवाल, ऋतुराज जाधव, राजेश माने हे सर्व गावाकडचे उच्चशिक्षित तरूण आहेत.संबंधित बातम्या