हरकती असलेल्या शेतकऱ्यांच्या जमीनी अधिग्रहित करणार नाही- सुभाष देसाई
21 January 18:46

हरकती असलेल्या शेतकऱ्यांच्या जमीनी अधिग्रहित करणार नाही- सुभाष देसाई


हरकती असलेल्या शेतकऱ्यांच्या जमीनी अधिग्रहित करणार नाही- सुभाष देसाई

कृषिकिंग, मुंबई: खंडाळ्यातील शेतकऱ्यांकडून भू-अधिग्रहण करताना अन्याय झाल्याचा आरोप करण्यात येत होता. याविरोधात शेतकऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. यावेळी देसाई यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान झाल्याचा दावा केला आहे.

अधिग्रहण टप्पा ३ मधील जमिनींबाबत पर्यायी जमिनी शेतकऱ्यांच्या मर्जीनेच घेण्यात येतील. हरकती असलेल्या जमीनी अधिग्रहित करणार नाही, असे आश्वासन त्यांनी या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले आहे. तसेच विविध कंपन्यामध्ये ३ हजार २२६ नोकऱ्या देण्यात आल्या. यापैकी २ हजार जण स्थानिक आहेत. एमआयडीसीचे अधिकारी पुढील आठवड्यात या गावांना भेट देतील, असेही देसाई यांनी सांगितले.

शेतकरी किसान मंच या संघटनेच्या नेतृत्वाखाली या शेतकऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले होते. हे सर्व शेतकरी खंडाळ्याहून मुंबईत दाखल झाले होते. गेल्या १० वर्षांपासून हे शेतकरी या भूसंपादनाला विरोध करत होते. खंडाळा एमआयडीसीसाठी या शेतकऱ्यांच्या जमिनीचे सक्तीने भूसंपादन करण्यात आले होते. दरम्यान, या शेतकऱ्यांनी मागण्या मान्य न झाल्यास जल समाधी घेण्याचा इशारा दिला होता.संबंधित बातम्या