'शेतकऱ्यांचं नेहमीचं रडगाणं' म्हणणाऱ्या गुलाबराव पाटलांना शेतकऱ्याचे खुले पत्र
19 January 11:00

'शेतकऱ्यांचं नेहमीचं रडगाणं' म्हणणाऱ्या गुलाबराव पाटलांना शेतकऱ्याचे खुले पत्र


'शेतकऱ्यांचं नेहमीचं रडगाणं' म्हणणाऱ्या गुलाबराव पाटलांना शेतकऱ्याचे खुले पत्र

कृषिकिंग, नांदेड:
प्रति,
गुलाबराव पाटील साहेब,
सहकार राज्यमंत्री तथा पालकमंत्री परभणी.
सप्रेम नमस्कार,
तुमचे शेतीमालाच्या भावाबाबत केलेले वक्तव्य पाहुन साहेब म्हणायला सुद्धा लाज वाटतेय. तुम्ही सहकार राज्यमंत्री आहात हे लक्षात आणून देण्यासाठी साहेब म्हनतोय.

साहेब जे ते उठतंय अन माझ्या शेतकरी माय-बापाला उर्मटपणे बोलतंय. ज्या अन्नदात्याने शेती पिकवायचे बंद केले तर संपूर्ण जगाला उपासमारीची वेळ येऊ शकते. त्या अन्नदात्याला तुम्ही काय समजताय हे आम्हा शेतकऱ्यांच्या पोरांच्या लक्षात येइना? पण साहेब एक लक्षात ठेवा, एका दान्याचे हजार दाने करून जगाची भूक मिटवण्याची ताकद ही माझ्या बापाच्या मनगटातचं आहे. टाटा, बिरला यांच्या कारखान्यांमध्ये आणखी ती सोय उपलब्ध नाही.

साहेब शेतकऱ्यांची मागणी तरी काय आहे. उत्पादन खर्च भरुन निघेल असा दीडपट हमीभाव. आणि त्यासाठी सातत्याने हमीभावाची आठवण करून द्यावी लागतेय हे आमचं दुर्दैवचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी हे आश्वासन सरकार सत्तेत येण्यापूर्वी दिलं होतं. केंद्रात, राज्यात तुमच युतीचं सरकार आहे.

साहेब...या कृषीप्रधान म्हणवल्या जाणाऱ्या देशात हजारो शेतकरी आपलं जीवन संपवत आहेत. सरन रचून शेतकरी आत्महत्या करत आहेत, याला जबाबदार तुम्ही शासनकर्ते आहात. शेतकऱ्यांना वाटत होते भाजप नाहीतर शिवसेना शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभी राहील. पण भाजप बरोबर शिवसेनाही तेवढीच जबाबदार आहे.

तुम्ही काय म्हणालात- 'शेतीमालाला भाव हे शेतकऱ्यांचे नेहमीचे रडगाणे' एक दिवस राञी शेतात येऊन बघा. शेतकऱ्यांची होणारी परेशानी येऊन बघा. राञी-अपराञी लाईट येते. साहेब... तूमच कोनत कार्यालय राञी दाऱ्यावरच्या (शेतात पाणी देणाऱ्या) शेतकऱ्याच्या समस्या साोडवतं. होणाऱ्या कामाच्या-कष्टाच्या मोबदल्यात माझ्या माय बापाची दोन वेळेची भूक कशीबशी भागते.

साहेब... येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर ज्याप्रमाणे तुम्हाला सत्तेत पाठवलं अगदी त्याच प्रकारे घरी पाठवायची ताकद बळीराजाकडे आहे. हे लक्षात ठिवा...तुमचे वर्तन असेच राहिले तर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल.
कळावे,

किरण कदम
एक शेतकरीपुञ
रा.देळुब (खु.) ता. अर्धापुर जि. नांदेड.संबंधित बातम्या