इंडोनेशिया, मलेशिया भारताकडून साखर आयात करणार
19 January 14:50

इंडोनेशिया, मलेशिया भारताकडून साखर आयात करणार


इंडोनेशिया, मलेशिया भारताकडून साखर आयात करणार

कृषिकिंग, नवी दिल्ली: साखरेच्या विक्रमी उत्पादनासोबतच शेतकऱ्यांच्या वाढत्या थकबाकी संदर्भात केंद्र सरकार साखर निर्यात वाढीसाठी प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर इंडोनेशिया आणि मलेशियाने भारताकडून साखर आयात करण्यास रुची दाखवली आहे. मात्र, यासाठी या देशांनी भारताला पाम तेलावरील आयात शुल्क कमी करण्यास सांगितले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडोनेशिया आणि मलेशिया भारताकडून जवळपास ११ ते १३ लाख टन साखरेची आयात करू शकतात. दरम्यान या दोन्ही देशांच्या मागणीनुसार पामतेलावरील आयात शुल्कात कपात करण्यासाठी केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालय चर्चा करत आहे.

केंद्र सरकार चीन, बांग्लादेश, श्रीलंका, इंडोनेशिया आणि मलेशिया मध्ये साखर निर्यातीसाठी प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारने आपले पथक या देशांमध्ये पाठवले होते. या पथकाच्या यशाने या देशांनी हा साखर खरेदीचा प्रस्ताव ठेवला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बांग्लादेश व श्रीलंकाही भारताकडून साखर आयात करत आहेत.संबंधित बातम्या