कमलनाथ सरकार कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करतंय- चौहान
17 January 15:59

कमलनाथ सरकार कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करतंय- चौहान

कमलनाथ सरकार कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करतंय- चौहान

कृषिकिंग, भोपाळ: मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जी प्रक्रिया राबवली जात आहे. त्यावर मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राज्यातील काँग्रेस सरकार लोकसभा निवडणुकीसाठी कर्जमाफीचा फायदा घेण्याच्या प्रयत्नात असून, सरकार शेतकऱ्यांची फसवणूक व छळ करत आहे. असेही ते म्हणाले आहे.

चौहान यांनी ट्विट करत सांगितले आहे की, "राज्य सरकारकडे कर्जमाफी अंतर्गत येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज आणि अन्य पद्धतीने छळण्यापेक्षा, थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ करून त्यांना प्रमाणपत्र देण्याची गरज आहे."संबंधित बातम्या