विमान वाहतूक व्यवसायातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग- राज्यपाल
17 January 11:09

विमान वाहतूक व्यवसायातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग- राज्यपाल


विमान वाहतूक व्यवसायातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग- राज्यपाल

कृषिकिंग, मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुपटीने वाढविण्याचे ध्येय निश्चित केले आहे. या ध्येयाच्या पूर्तीसाठी शेतकऱ्यांचे तसेच किरकोळ उत्पादकांचे उत्पन्न वाढविण्यात विमान वाहतूक व्यवसायाचा मोठा हातभार लागणार आहे," असे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी सांगितले आहे. ग्लोबल एव्हिएशन समिट या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सांगता समारोहात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू, राज्यमंत्री जयंत सिन्हा उपस्थित होते.

जागतिक विमान वाहतूक उद्योग जलद गतीने वाढत आहे. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन संघटनेने २०३० पर्यंत जागतिक हवाई प्रवाहात १०० टक्के वाढीची भविष्यवाणी केली आहे. देशातील विमान वाहतूक उद्योग वाढीसाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. देशातील विमान वाहतूक व्यवसाय हा अर्थव्यवस्था वाढीतील एक प्रमुख घटक आहे. गेल्या चार वर्षात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यात नागरी हवाई वाहतूक आणि रिजनल कनेक्ट‍िव्हीटीचे महत्त्वपूर्ण धोरण आखले गेले आहे. असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले आहे.संबंधित बातम्या