शेतकऱ्यांचे खावटी कर्जेही माफ: मंत्रिमंडळाचा निर्णय
15 January 17:27

शेतकऱ्यांचे खावटी कर्जेही माफ: मंत्रिमंडळाचा निर्णय


शेतकऱ्यांचे खावटी कर्जेही माफ: मंत्रिमंडळाचा निर्णय

कृषिकिंग, मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आता शेतकऱ्यांची खावटी कर्जेही माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज (१५ जानेवारी) घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय आजच्या बैठकीत राज्य सरकारने १३ मोठे निर्णय घेतले आहेत. ओबीसी युवकांना वैयक्तिक कर्जाची मर्यादा २५ हजार रुपयांवरून एक लाख रुपये करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. तसेच ओबीसी महामंडळाला २५० कोटी रुपयांचे तर वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती जमाती महामंडळास २०० कोटी रुपयांचे भागभांडवल देण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. वडार व रामोशी समाजाला विशेष पॅकेज देण्यात आलं आहे. तसेच इतर मागासवर्गातील मुला-मुलींसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी मागणीनुसार एकूण ३६ वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहेटॅग्स

संबंधित बातम्या