मध्यप्रदेशात कर्जमाफी योजनेचे फॉर्म भरण्यास सुरुवात
16 January 08:30

मध्यप्रदेशात कर्जमाफी योजनेचे फॉर्म भरण्यास सुरुवात


मध्यप्रदेशात कर्जमाफी योजनेचे फॉर्म भरण्यास सुरुवात

कृषिकिंग, भोपाळ: मध्यप्रदेशात कर्जमाफी योजनेचे फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे. भोपाळ येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या उपस्थितीत एमपी सरकारच्या या कर्जमाफी योजनेला 'जय किसान कर्जमुक्ती योजना' असे नाव देण्यात आले आहे. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात १५ शेतकऱ्यांचे फॉर्म भरून घेण्यात आले.

एमपी सरकारच्या या योजनेमुळे ५० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होणार असून, या शेतकऱ्यांना ५० लाख कोटींची कर्जमाफी देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडून अर्ज भरून, त्यांची छाननी, पडताळणी करून २२ फेब्रुवारी पासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. अशी माहिती मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या कार्यक्रमात दिली आहे.संबंधित बातम्या