सरकारकडून माझे आणि कार्यकर्त्यांचे फोन टॅप होतायेत- राजू शेट्टी
14 January 18:43

सरकारकडून माझे आणि कार्यकर्त्यांचे फोन टॅप होतायेत- राजू शेट्टी


सरकारकडून माझे आणि कार्यकर्त्यांचे फोन टॅप होतायेत- राजू शेट्टी

कृषिकिंग, पुणे: सरकारकडून माझे आणि माझ्या कार्यकर्त्यांचे फोन टॅप होत आहेत. असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी पुण्यात केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपीच्या रकमेसाठी आक्रमक झाली असून, खासदार शेट्टी मुख्यमंत्र्यांसह भाजप सरकारवरही टीका करत आहेत. मात्र, पुण्यात त्यांनी त्यांचे व कार्यकर्त्यांचे मोबाईलवरून संभाषण सुरु असताना फोन टॅप होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

माझे आणि ज्या कार्यकर्त्यांचे फोन झाले त्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे ही आमच्या मूलभूत हक्कांवर गदा आहे असेही ते म्हणाले आहे. दरम्यान, भाजपाध्यक्ष अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर अमित शहा यांचा आगामी कोल्हापूर दौरा सुरक्षित करायचा असेल तर सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत एफआरपीची संपूर्ण रक्कम द्यावी. असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.संबंधित बातम्या