झारखंड सरकारने २४ महिला शेतकऱ्यांना इस्राईलला पाठवले
कृषिकिंग, रांची(झारखंड): उन्नत शेतीचे तंत्र शिकण्यासाठी झारखंड सरकारने २४ महिला शेतकऱ्यांना इस्राईलला पाठवत आहे. मुख्यमंत्री रघुवर दास यांनी याबाबत माहिती दिली आहे. झारखंडमधील रामगढच्या उपायुक्त राजेश्वरी बी यांच्या नेतृत्वाखाली ४ महिला अधिकाऱ्यांच्या टीमसोबत या २४ महिला शेतकऱ्यांना पाठवण्यात आले आहे. १८ जानेवारी रोजी या महिला शेतकऱ्यांच्या टीम इस्राईलवरून वापस येणार आहे.
मुख्यमंत्री रघुवर दास यांनी सांगितले आहे की, "कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत आपल्या महिला शेतकरी भगिनी कृषी क्षेत्रात उत्तम योगदान देत आहेत. यावेळी त्यांनी या पाठवण्यात आलेल्या महिला शेतकऱ्यांना इस्राईल मधील शेतीतील तंत्र बारकाईने अभ्यासण्याचे आवाहन केले आहे. या महिला शेतकरी इस्राईल मधून वापस आल्यानंतर आपापल्या जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांसह अन्य शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे.