'दम असेल तर..', सदाभाऊंचं राजू शेट्टींना आव्हान
12 January 18:28

'दम असेल तर..', सदाभाऊंचं राजू शेट्टींना आव्हान


'दम असेल तर..', सदाभाऊंचं राजू शेट्टींना आव्हान

कृषिकिंग, कोल्हापूर: एक दगड मारून ब्रेकिंग न्यूज करण्यापलीकडे शेट्टींच्या संघटनेत हिंमत नाही. 'दम असेल तर कारखानदारांच्या दारात जाऊन आंदोलन करा'. असं आव्हान देत कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कृषी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते येथे झाले. यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

त्यामुळे खा. राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत हे पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे दिसून आले आहे. साखर कारखानदारांचे नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे कोल्हापुरात येणार आहेत. अशात ऊस दराचा वाद पुन्हा हिंसक घटनांकडे वळू लागला आहे. तर, रात्री शेट्टी यांची शिरोळ तालुक्यातील नांदणी गावात जाहीर सभा होणार असून, ते तापत चाललेल्या ऊस दर आंदोलनाबाबत कोणती भूमिका घेणार याची दिशा ठरणार आहे.

थकीत ऊस देयकाच्या मागणीसाठी कोल्हापूरात निघालेल्या मोर्चावेळी खासदार राजू शेट्टी यांनी मंत्री दिसतील तिथे त्यांना अडवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. त्यातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांना लक्ष्य करीत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावा, अन्यथा अमित शाह यांचा कोल्हापूर दौरा सुरळीत होऊ देणार नसल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला होता. त्याचा समाचार घेताना खोत यांनी ‘ अमित शाह आणि मंत्र्यांना अडवायला मोगलाई नाही. वेळ पडल्यास ‘इट का जवाब पथ्थर से’ देऊ’ असा प्रतिइशारा शेट्टीं यांना दिला आहे.टॅग्स

संबंधित बातम्या