ऊस दरावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक
12 January 10:28

ऊस दरावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक


ऊस दरावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक

कृषिकिंग, सांगली: ऊस दरावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली आहे. उसाला २३०० रुपये पहिली उचल दिल्यामुळे काल रात्री रेठरेहरणाक्ष येथील कृष्णा साखर कारखान्याचे गेटकेन ऑफिस पेटवून दिले आहे.

एक रकमी एफआरपी द्यावी २३०० रुपये पहिली उचल नको. अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आहे. पण पहिली उचल २३०० दिली गेल्याने स्वाभीमानी शेतकरी संघटनेने आंदोलनचा बडगा उचलला आहे. लवकरात लवकर उसाचा तिढा भाजप सरकारने सोडवावा अन्यथा भाजपचे अमित शहा हे सांगली कोल्हापूरला येणार आहेत. त्यांना या जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशाराही खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.संबंधित बातम्या