व्यवस्थेने माझ्या नवऱ्याच बळी घेतला; शेतकरी वैशाली येडे
11 January 18:43

व्यवस्थेने माझ्या नवऱ्याच बळी घेतला; शेतकरी वैशाली येडे


व्यवस्थेने माझ्या नवऱ्याच बळी घेतला; शेतकरी वैशाली येडे

कृषिकिंग, यवतमाळ: "अडचणीच्यावेळी दिल्लीतच तर गल्लीतही बाईच कामी येते हे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले आहे. आम्ही विधवा नाही एक महिला आहोत. नवरा कमकुवत होता तो गेला मी लढणार आहे. सध्या शेतकरी आणि लेखकाला भाव नाही. माझ्या वैधव्याला व्यवस्था जबाबदार आहे." असे म्हणत साहित्य संमेलनाच्या उद्घाटक शेतकरी वैशाली येडे यांनी ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाच्या प्रसंगी झालेल्या या भाषणानंतर सभामंडपात टाळ्यांचा कडकडाट झाला. हे भाषण गेले काही दिवस गाजत असलेल्या प्रभावी व्यक्तींपैकी कुणाचेही नव्हते.. ते होते वैशाली येडे यांचे..! त्यांच्या शेतकरी पतीने आत्महत्या केली होती.

रिमोटद्वारे बटण दाबून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. इंग्रजी साहित्यातील सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून बोलवण्यात आले होते. मात्र त्यांना दिलेले निमंत्रण मनसेच्या भूमिकेमुळे मागे घेण्यात आले. मनसेने मात्र या प्रकरणी माघार घेत सहगल यांना आमचा विरोध नाही असे सांगितले तरीही नयनतारा सहगल या संमेलनाला आल्या नाहीत.

ज्यानंतर शेतकरी विधवेच्या हस्ते या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याचा निर्णय झाला. वैशाली येडे यांनी उद्घाटनप्रसंगी भाषण करत माझ्या वैधव्याला यंत्रणा जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.संबंधित बातम्या