उत्तरप्रदेश सरकारकडून युरियाच्या किमतीत ३२.५० रुपयांची कपात
11 January 16:05

उत्तरप्रदेश सरकारकडून युरियाच्या किमतीत ३२.५० रुपयांची कपात


उत्तरप्रदेश सरकारकडून युरियाच्या किमतीत ३२.५० रुपयांची कपात

कृषिकिंग, लखनऊ: उत्तरप्रदेश सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी युरियाच्या किमतीत कपात केली आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल रात्री उशिरा युरियाच्या किमतीत कपात केल्याची घोषणा केली आहे.

उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांना ४५ किलो युरियाच्या बॅगसाठी २६६.५० रुपयांना मिळणार आहे. जी आतापर्यंत २९९ रुपयांना मिळत होती. याचप्रमाणे ५० किलोच्या बॅग २९५ रुपयांना मिळणार आहे. जी यापूर्वी ३३०.५० रुपयांना मिळत होती.

उत्तरप्रदेश सरकारने राज्यात प्राकृतिक गॅसवर अतिरिक्त मूल्यवर्धित कर हटवला आहे. याआधी प्राकृतिक गॅसवर अतिरिक्त मूल्यवर्धित कर लागू असल्याने उत्तरप्रदेशात अन्य राज्यांच्या तुलनेत युरिया महाग मिळत होता. आता सरकारने हा कर हटवला असून, युरियाचे नवे दर १२ जानेवारीपासून लागू असणार आहे.टॅग्स

संबंधित बातम्या