जमीन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची नवी योजना
11 January 14:14

जमीन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची नवी योजना


जमीन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची नवी योजना

कृषिकिंग, नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासादायक पॅकेज देण्याचा निर्णय सरकारतर्फे लवकरच घेतला जाऊ शकतो. या नव्या प्रस्तावामध्ये स्वत:ची जमीन नसणाऱ्या शेतकऱ्यांनाही सामील करुन घेण्यात येणार आहे. नव्या प्रस्तावानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम दिली जाणार आहे.

ओडिसा आणि तेलंगणा मॉडेलची झलक या प्रस्तावात पाहायला मिळणार आहे. या योजनेनुसार प्रत्येक शेतकरी परिवारासाठी एक विशिष्ट रक्कम ठरवली जाणार आहे. तेलंगणामध्ये प्रत्येक पेरणीसाठी ४ हजार रुपये प्रति एकर दिले जातात. ओडिशामध्ये प्रति कुटुंब ५ हजार रुपये शेतकऱ्यास देण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतक-यांना सरकारी खरेदीची खात्री दिली जाते. या पॅकेजमध्ये विमा, शेती कर्जे आणि आर्थिक मदत एकत्रितपणे विचारली जात आहे. वैयक्तिक फायदे देण्याऐवजी सरकार कुटुंबास मदत देण्याचा विचार करू शकते. या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाव्यतिरिक्त आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी एक योजना आखली जात आहे.

योजनेचा छोट्या, सीमांत आणि भागधारकांना किंवा भाड्याने जमीन घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यावर जोर दिला जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यety० टक्के व्याजाने कर्ज देण्याचे विचाराधीन आहे. सरकार ओडिशाच्या "कालिया" मॉडेलचा अभ्यास करत आहे. कालिया मॉडेलनुसार प्रत्येक शेतकरी परिवाराला ५ हंगामी पीकांसाठी २५ हजार पर्यंत एक विशिष्ट रक्कम देण्याचा विचार आहे.



संबंधित बातम्या