यावर्षीच्या पावसाळ्यात एल निनोचा अडथळा नाही- राजीवन
11 January 12:33

यावर्षीच्या पावसाळ्यात एल निनोचा अडथळा नाही- राजीवन


यावर्षीच्या पावसाळ्यात एल निनोचा अडथळा नाही- राजीवन

कृषिकिंग, पुणे: "यावर्षीच्या पावसाळ्यात प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचा प्रवाह (एल निनो) हा अडथळा राहणार नाही," अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे आता दुष्काळाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्राला पुढील वर्षी काहीसा दिलासा मिळणार आहे.

यावर्षी राज्यात पावसाने ओढ दिली. त्यामुळे डिसेंबरअखेर पासूनच राज्याच्या वेगवेगळ्या भागात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. या पार्श्‍वभूमीवर एका कार्यक्रमासाठी पुण्यात पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन नायर राजीवन आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.संबंधित बातम्या