उद्धव ठाकरेंनी एखादी विमा कंपनी सुरू करावी- चंद्रकांत पाटील
10 January 18:46

उद्धव ठाकरेंनी एखादी विमा कंपनी सुरू करावी- चंद्रकांत पाटील


उद्धव ठाकरेंनी एखादी विमा कंपनी सुरू करावी- चंद्रकांत पाटील

कृषिकिंग, सांगली: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पीक विम्यावरून बीडमध्ये केलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे. विमा कंपन्यांना नुकसानीनुसार प्रत्येक जिल्ह्यात कमी अधिक नुकसान द्यावे लागते. ज्यांनी आरोप केलेत त्यांनी एक विमा कंपनी सुरू करावी. असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

पीक विम्याच्या वाटपात कुठेही भ्रष्टाचार झाला नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. याशिवाय आम्ही सध्या दुष्काळावरच बोलत आहोत. मात्र, वेळ आली आहे ती युतीवर बोलण्याची असा चिमटाही त्यांनी शेवटी शिवसेनेला काढला आहे.संबंधित बातम्या