आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी ९२ व्या मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन करणार
10 January 17:46

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी ९२ व्या मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन करणार


आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी ९२ व्या मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन करणार

कृषिकिंग, यवतमाळ: ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल आमंत्रित होत्या. मात्र, राजकीय दबावामुळे अखेर संमेलनाच्या आयोजकांनीच हे आमंत्रण रद्द केले. आता या वादावर पडदा पडला असून संमेलनाचे उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते करण्यात येणार आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असलेल्या यवतमाळ येथे संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यावरून वाद निर्माण झाला होता. यावर चर्चा करण्यासाठी साहित्य महामंडळ आणि घटक संस्थांची नुकतीच बैठक पार पडली. यामध्ये उदघाटक बदलल्यामुळे नयनतारा सहगल यांचे भाषण वाचून दाखविले जाणार नाही. सहगल यांच्याऐवजी आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी उद्घाटक म्हणून बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला, असे महामंडळाच्या सदस्यांनी सांगितले आहे.संबंधित बातम्या