त्या शेतकऱ्याची नोव्हेंबरमध्येच कर्जमाफी- सुभाष देशमुख
10 January 17:27

त्या शेतकऱ्याची नोव्हेंबरमध्येच कर्जमाफी- सुभाष देशमुख


त्या शेतकऱ्याची नोव्हेंबरमध्येच कर्जमाफी- सुभाष देशमुख

कृषिकिंग, मुंबई: "शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी बीडच्या सभेत ज्या शेतकर्‍याला उभे केले होते, त्यांच्या कर्जमाफीचे पैसे नोव्हेंबर २०१८ मध्येच स्टेट बँकेला शासनातर्फे देण्यात आलेले आहेत," असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले आहे.

बाळासाहेब हरिभाऊ सोळंके असे या शेतकर्‍याचे नाव असून, त्यांचे कर्ज खाते क्रमांक ३३८१७३६९६५७ असे आहे. हे स्टेट बँकेतील खाते असून, त्यांनी २०१४ मध्ये कर्ज घेतले होते. पुढे हे खाते एनपीए झाले. एनपीए खात्यांसंदर्भात काय करायचे, याचा निर्णय राज्यस्तरिय बँकर्स समितीत आधीच घेण्यात आला आहे. त्यानुसार, पूर्णपणे बुडित निघालेल्या खात्याला पुनरूज्जीवित करण्यासाठी सरकारने किती योगदान द्यायचे, याचे सूत्र त्यात ठरविण्यात आले. त्यानुसार, या शेतकर्‍याचे ९८ हजार ६८७ इतक्या रूपयाचे खाते एनपीए खाते पुन्हा त्या शेतकर्‍याला बँकिंग नेटवर्कमध्ये आणण्यासाठी ५८ हजार ४९३ रूपयांचे योगदान शासनाकडून देण्यात आले. त्यामुळे सदर शेतकर्‍याचे खाते पुन्हा नव्याने सुरू होऊ शकेल. शासनामार्फत ही रक्कम बँकेला जरी देण्यात आली असली तरी याच एनपीए अकाऊंटसंदर्भातील करारानुसार, शेतकर्‍याचे संपूर्ण ९८ हजार ६८७ रूपये माफ झालेले आहे, असेही सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे.

बीड येथे उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या घोषणा केवळ कागदावर असतात, हे दाखवण्यासाठी बाळासाहेब सोळंके या शेतकऱ्याला सभेत उभे केले. मात्र त्यानंतर आता यासंबंधातले स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.संबंधित बातम्या