हरियाणातील शेतकऱ्यांना प्रति महिना ५ हजार रुपये पेन्शन मिळणार
10 January 16:39

हरियाणातील शेतकऱ्यांना प्रति महिना ५ हजार रुपये पेन्शन मिळणार


हरियाणातील शेतकऱ्यांना प्रति महिना ५ हजार रुपये पेन्शन मिळणार

कृषिकिंग, चंदीगड(हरियाणा): हरियाणा सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मासिक पेन्शन देण्याची योजना बनवली आहे. यासाठी हरियाणा सरकारकडून शेतकरी पेन्शन प्रस्ताव समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना प्रति महिना ५ हजार रुपये पेन्शन देण्यावर सहमती झाली आहे.

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या नाराजीतुन भाजपचा दारुण पराभव झाला. त्यामुळे आता इतर राज्यांमधील सरकारेही शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याच्या तयारीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हरियाणा सरकार या योजनेची लवकरच घोषणा केली जाऊ शकते.

हरियाणा सरकारकडून स्थापन करण्यात आलेली शेतकरी पेन्शन प्रस्ताव समिती लवकरच आपला अहवाल मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना सादर करणार आहे. यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांची आकडेवारी जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. हरियाणा सरकारकडून ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना ही पेन्शन दिली जाणार आहे.संबंधित बातम्या