दुष्काळ जाहीर झाला अन आतापर्यंत सूट मिळाली केवळ ८३ पैसे
10 January 15:45

दुष्काळ जाहीर झाला अन आतापर्यंत सूट मिळाली केवळ ८३ पैसे


दुष्काळ जाहीर झाला अन आतापर्यंत सूट मिळाली केवळ ८३ पैसे

कृषिकिंग, औरंगाबाद: दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना महसुलात सूट देण्यात आली आहे. मराठवाडय़ातील आठ जिल्हय़ांतील शेतकऱ्यांना महसुलात २८ लाख ९५ हजार ८२४ रुपयांची सूट देण्यात आली. तर मराठवाड्यातली एकूण शेतकऱ्यांची संख्या ३४ लाख ८२ हजार ६६३ इतकी आहे. त्यामुळे महसूल भरण्यातून मिळालेली प्रतिशेतकरी सूट ही फक्त ८३ पैसे इतकी आहे.

दुष्काळ घोषित केल्यानंतर प्रत्यक्षात मिळालेला आत्तापर्यंतचा लाभ एवढाच आहे. केंद्र सरकारला मदतीसाठी ७ हजार ९०० कोटींची मागणी सरकारने केली आहे. पण ती कधी मिळणार हे अद्यापि अस्पष्टच आहे. अर्थात, शेतसारा असा फारसा नसतोच. पण तो सरकार दरबारी सूट या श्रेणीत गणला जातो.

सध्यस्थितीत धरणांमध्ये पाणीसाठा नाही. विहिरी कोरडय़ा पडल्या आहेत. त्यामुळे वीजवापराचे प्रमाण कमी आहे. त्यात ३३ टक्के सूट दिली जात असली तरी थकबाकीची रक्कम खूपच आहे. मराठवाडय़ातील कृषिपंपाची थकबाकीची रक्कम ९ हजार १८६ कोटी एवढी आहे. विद्यार्थ्यांनी भरलेले शुल्क शाळांना परत केली जाणार आहे.

रोजगार हमीची काही कामे सुरू आहेत आणि तब्बल ९११ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या दोन योजना दुष्काळ जाहीर न करताही सुरूच होत्या. त्यामुळे दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरी काय पडले तर फक्त ८३ पैशाची सूट. बाकी मदत करणे आता केंद्र सरकारच्या हाती आहे.टॅग्स

संबंधित बातम्या