मॉन्सेंटोचा बियाण्यासंदर्भातील पेटंट दावा योग्य- सर्वोच्च न्यायालय
11 January 08:30

मॉन्सेंटोचा बियाण्यासंदर्भातील पेटंट दावा योग्य- सर्वोच्च न्यायालय


मॉन्सेंटोचा बियाण्यासंदर्भातील पेटंट दावा योग्य- सर्वोच्च न्यायालय

कृषिकिंग, नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने बहुराष्ट्रीय कंपनी मॉन्सेंटोला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने जेनेटिकली मॉडिफाइड कापसाच्या बियाण्यासंदर्भातील कंपनीच्या पेटंट दाव्याला योग्य असल्याचे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे की, अमेरीकन बियाणे उत्पादक कंपनी जीएम (जेनेटिकली मॉडिफाइड) कापसाच्या बियाण्याच्या पेटंटवर दावा करू शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे दिल्ली उच्च न्यायालयाचा याआधीच निर्णय रद्दबाबत ठरला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने ११ एप्रिल २०१८ रोजी मॉन्सेंटो विरूद्ध भारतीय बियाणे उत्पादक कंपन्या या प्रकरणात सुनावणीदरम्यान निकाल दिला होता की, मॉन्सेंटो भारतीय बियाणे बाजारात बीटी कापसाच्या बियाण्याचे पेटंट करू शकत नाही.

त्याविरोधात मॉन्सेंटोने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत, याचिका दाखल केली होती. मात्र, मॉन्सेंटोने दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. आणि सर्वोच्च न्यायालयाने निकालात मॉन्सेंटोला दिलासा दिला आहे.संबंधित बातम्या