मोदी सोलापुरात आले; मात्र, दुष्काळावर न बोलताच निघून गेले
10 January 11:59

मोदी सोलापुरात आले; मात्र, दुष्काळावर न बोलताच निघून गेले


मोदी सोलापुरात आले; मात्र, दुष्काळावर न बोलताच निघून गेले

कृषिकिंग, पुणे: विविध विकासकामांच्या निमित्ताने काल (बुधवारी) सोलापुरात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेतील भाषणाकडे मोठ्या आशेने डोळे आणि कान लावून बसलेल्या तमाम शेतकऱ्यांची निराशा झाली. पंतप्रधान मोदी हे दुष्काळ आणि शेतकरी कर्जमाफीवर बोलतील अशी त्यांची आशा अक्षरशः फोल ठरविली. भाजप सरकारने केलेल्या देशभरातील विकासकामांची भलीमोठी यादी वाचून दाखवत पंतप्रधान मोदी यांनी शेजाऱ्यांच्या प्रश्नावर चुकार शब्दही न काढल्याने सभेसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरला येणार म्हटल्यानंतर सोलापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातून शेतकरी मोठ्या आशेने आलेले होते.

मोदींच्या भाषणापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे पाहत महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला आहे. सोलापूर जिल्हासुद्धा यामध्ये होरपळून जात आहे . सोलापूर जिल्ह्यात तर केवळ ३८ टक्के पाऊस पडला असल्याने शेतकरी अडचणीत आल्याचे सांगितले. या दुष्काळाची केंद्रीय पथकाकडून पाहणीही करण्यात आली आहे. केंद्राकडे तसा दुष्काळाचा अहवालही देण्यात आला आहे. या दुष्काळासाठी दिलेल्या प्रस्तावाबाबत विचार व्हावा अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाला सुरुवात झाली. भाषण सुरु होऊन संपत आले तरीसुद्धा मोदी यांनी शेतकरी कर्जमाफी आणि दुष्काळाबद्धल कोणतीच वाच्यता केली नाही. त्यामुळे मोदी शेतीविषयी आणि दुष्काळाबाबत काहीतरी घोषणा करतील या आशेने आलेल्या शेतकऱ्यांची मात्र घोर निराशा झाली.संबंधित बातम्या