उद्धव ठाकरेंनी भंडाफाेड करताच शेतकऱ्याचे ९८ हजाराचे कर्ज ३ तासांत माफ
10 January 10:56

उद्धव ठाकरेंनी भंडाफाेड करताच शेतकऱ्याचे ९८ हजाराचे कर्ज ३ तासांत माफ


उद्धव ठाकरेंनी भंडाफाेड करताच शेतकऱ्याचे ९८ हजाराचे कर्ज ३ तासांत माफ

कृषिकिंग, बीड: बीडच्या धारूर तालुक्यातील अंजनडाेहचे शेतकरी बाळासाहेब सोळंके यांना १५ महिन्यांपूर्वीच राज्य शासनाकडून कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळाले, पण कर्ज माफ झालेच नाही. बीडमधील सभेत उद्धव ठाकरे यांनी थेट सोळंकेंना व्यासपीठावर उभे करत सरकारने फसवणूक केल्याचा आरोप करत त्यांची कैफियत मांडली. यानंतर शासनदरबारी वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलली. अवघ्या तीनच तासांतच सोळंकेंच्या बँक खात्यात ७० हजारांची रक्कम कर्जातून वळती झाली. त्यांच्यावर ९८ हजारांचे कर्ज हाेते. ज्या कर्जमाफीला तीनच तास पुरले, ती १५ महिन्यांत का झाली नाही, असा प्रश्न यानंतर उपस्थित होत आहे.

बाळासाहेब सोळंकेंकडे साडेसहा एकर जमीन आहे. वृद्ध आजी, आई, भावाचे कुटुंब, पत्नी, मुले असा परिवार आहे. २०१२ मध्ये सोळंके यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या धारूर शाखेतून खरिपासाठी ६८,८१४ रुपयांचे कर्ज घेतले. मात्र दुष्काळामुळे ते फेडता आले नाही. व्याजासह कर्जाची रक्कम ९८,९५० रुपये झाली. २०१७ मध्ये सरकारने शेतकरी कर्जमाफी दिली. २६ ऑक्टोबर २०१७ रोजी बीडमध्ये साेळंकेंना समारंभपूर्वक जिल्हाधिकारी व आमदारांच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले. १५ महिने उलटूनही कर्जमाफीच्या ग्रीन लिस्टमध्ये नाव नसल्याने सोळंकेंनी बँक अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी, उपनिबंधक कार्यालयात अनेकदा खेटे मारले. मात्र काही केल्या त्यांचे कर्ज माफ होत नव्हते.संबंधित बातम्या