विमा कंपन्याचा घोटाळा हा राफेलच्या घोटाळ्यापेक्षाही मोठा- उद्धव ठाकरे
09 January 18:51

विमा कंपन्याचा घोटाळा हा राफेलच्या घोटाळ्यापेक्षाही मोठा- उद्धव ठाकरे


विमा कंपन्याचा घोटाळा हा राफेलच्या घोटाळ्यापेक्षाही मोठा- उद्धव ठाकरे

कृषिकिंग, जालना: "मराठवाड्यात सध्या दुष्काळामुळे आक्रोश-आकांत सुरू आहे. पंतप्रधान मात्र दुष्काळावर शब्दही न बोलता केवळ नवनवीन योजनांची घोषणा करीत उद्घाटनाची नारळे फोडत फिरत आहेत, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मात्र प्रत्यक्षात कुठलीही मदत दिली जात नाही," असा निशाणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर साधला आहे.

विमा कंपन्या शेतकऱ्यांकडून विम्यापोटी रक्कम भरून घेतात, पंरतु शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम दिली जाते. देशातील विमा कंपन्याचा घोटाळा हा राफेलच्या घोटाळ्यापेक्षाही मोठा आहे. असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहे. मराठवाड्याच्या दुष्काळी भागात जाऊन ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर देत आहेत. आज (बुधवारी) दुपारी बीड येथील सभा आटोपून ठाकरे यांनी जालन्यातील मातोश्री लॅान्स येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पशुखाद्य व इतर मदत वाटप करण्यात आली. रामदास कदम, एकनाथ शिंदे, अर्जुन खोतकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली. पंरतु, प्रत्यक्षात या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी थेट संवाद करीत किती जणांना या योजनेचा लाभ मिळाला याची विचारणा केली असता एकाही शेतकऱ्याने हात वर केला नाही. मग या योजनेचे पैसे कुठे गेले असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.संबंधित बातम्या