डिसेंबर महिन्यात डीओसीच्या निर्यातीत २३ टक्क्यांनी घट
10 January 08:30

डिसेंबर महिन्यात डीओसीच्या निर्यातीत २३ टक्क्यांनी घट


डिसेंबर महिन्यात डीओसीच्या निर्यातीत २३ टक्क्यांनी घट

कृषिकिंग, नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या दर घसरणीमुळे डिसेंबर महिन्यात देशातील डीओसीच्या निर्यातीत २३ टक्क्यांनी घट झाली आहे. यावर्षी ३ लाख ३ हजार ११५ टन डीओसीची निर्यात करण्यात आली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात ३ लाख ९१४ हजार ४३१ टन इतकी नोंदवली गेली होती.

साल्वेंट एक्सट्रेक्टर्स एसोसिएशन आफ इंडियाच्या (एसईए) माहितीनुसार, दक्षिण कोरियासह व्हिएतनाममधून चालू आर्थिक वर्षात मागणी घटली आहे. तर याचवेळी थायलंडमधून आयात मागणी वाढली असून, इराण एक मोठा आयातदार देश म्हणून समोर आहे. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत इराणने जवळपास ३ लाख टन डीओची आयात केली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत २३ हजार टन इतकीच करण्यात आली होती.

एसईएच्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांमध्ये एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत डीओसीच्या निर्यातीत ६ टक्क्यांनी वाढ झाली असून, ती २३ लाख ८७ हजार ०२८ टन इतकी नोंदवली गेली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या