शेतकऱ्यांना नक्षलवादाच्या दिशेने घेऊन जावू नये- रविकांत तुपकर
08 January 12:49

शेतकऱ्यांना नक्षलवादाच्या दिशेने घेऊन जावू नये- रविकांत तुपकर


शेतकऱ्यांना नक्षलवादाच्या दिशेने घेऊन जावू नये- रविकांत तुपकर

कृषिकिंग, अकोला: शेतकऱ्यांप्रती बेजबाबदार शासन शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी नको त्यांच्या कृषी उत्पादनास हमी भाव पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले आहे.

अकोल्यातील मूर्तिजापूर येथील तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या एक दिवसीय धरणे आंदोलना दरम्यान ते बोलत होते. भाजपा सरकारकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढतांना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीची मिमिक्री करीत मोदींना रात्रीचा नाद असल्याचे नमुद करतांना त्यांनी जीएसटी, फुलतांब्याचा निर्णय आदी उदाहरणे दिली. शेतकऱ्यांप्रती उदासीन धोरणाचा निषेध करीत शेतकऱ्यांना नक्षलवादाच्या दिशेने घेऊन जावू नये असा दम त्यांनी शासनाला भरला वा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.संबंधित बातम्या