डॉ. चोरमुले यांचा महाराष्ट्रातील अमेरिकन लष्करी अळीवरील संशोधनावर आधारित शोधनिबंध आंतर्राष्ट्रीय नियतकालीकात प्रकाशित
07 January 20:15

डॉ. चोरमुले यांचा महाराष्ट्रातील अमेरिकन लष्करी अळीवरील संशोधनावर आधारित शोधनिबंध आंतर्राष्ट्रीय नियतकालीकात प्रकाशित


डॉ. चोरमुले यांचा महाराष्ट्रातील अमेरिकन लष्करी अळीवरील संशोधनावर आधारित शोधनिबंध आंतर्राष्ट्रीय नियतकालीकात प्रकाशित

कृषिकिंग, पुणे: महाराष्ट्रात मका, ज्वारी आणी ऊस पिकावर झपाट्याने पसरणाऱ्या अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आणि संशोधन याबाबतचा शोधनिबंध नुकताच 'जर्नल ऑफ एंटोमोलॉजी अँड झुलॉजीकल स्टडीज' या आंतर्राष्ट्रीय जर्नल मध्ये प्रकाशीत झाला. डॉ. अंकुश चोरमुले (6th Grain Corp., पुणे) यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रातून मका पिकावर आणि भारतातील पहिलीच ऊसावरील 'अमेरिकन लष्करी अळी' ची नोंद केली. तसेच महाराष्ट्रातील 'होय आम्ही शेतकरी' समुहातील शेतकऱ्यांच्या मदतीने राज्यभरातून या किडीच्या नोंदी गोळा केल्या आणि या माहितीचा वापर करून बाधित क्षेत्राचा ऑनलाईन नकाशा देखील तयार केला.
सदर कामाची दखल शिवमोगा विद्यापीठ (कर्नाटक) येथील शास्त्रज्ञ डॉ. शरणबसप्पा देशमुख यांनी घेत कोल्हापूर, सांगली भागात सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना या किडीबाबत अधिक माहिती दिली. तसेच शोधनिबंध लिहण्यास मोलाची भूमिका बजावली. तसेच कर्नाटकातील इतर शास्त्रज्ञांनी देखील यात मोठे योगदान दिले.
सदर शोधनिबंध आपण या लिंकवर जाऊन पाहू शकाल- http://bit.ly/2SHnavg

महाराष्ट्रातील हे संशोधन कोणत्याही शासकीय निधीशिवाय अतिशय कमी वेळात पूर्ण होण्यासाठी सोशल माध्यम आणि शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग या गोष्टी मोलाच्या ठरल्या. महाराष्ट्रातील नोंदी आणि विस्तार कार्यासाठी 6th Grain Corporation या संस्थेने निधी दिला आहे.

सदर संशोधन आणि प्रदुर्भावाच्या नोंदी ऑक्टोबर महिन्यातच कृषीविद्यापीठे, कृषीविभाग, केंद्रीय कृषीसंशोधन संस्था, भाकृअनुप यांना कळविण्यात आल्या होत्या असेही डॉ. चोरमुले यांनी कृषिकिंगला सांगितले. यापुढे राज्यातील कृषीसंशोधन संस्था, विद्यापीठे आणि कृषीविभाग या वस्तुस्थितीला गांभीर्याने घेऊन मोठ्या प्रमाणावर या परदेशी किडीच्या नियंत्रणासाठी काम करतील ही अपेक्षा आहे असे मत या संशोधन विस्तार कामात मदत करणारे युवा शेतकरी श्री. अमोल पाटील (आष्टा, सांगली) यांनी कृषिकिंग सोबत बोलताना व्यक्त केले.

सदर संशोधन अहवाल मराठीत या लिंकवर उपलब्ध आहे - http://bit.ly/2SEOwSLसंबंधित बातम्या