ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकबाकीवरून योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका
07 January 17:40

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकबाकीवरून योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका


ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकबाकीवरून योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

कृषिकिंग, नवी दिल्ली: ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकबाकीवरील व्याज देण्यासंदर्भातील प्रकरणात अलाहाबाद हाय कोर्टानंतर आता सर्वोच्च न्यायायलाने योगी आदित्यनाथ सरकारला झटका दिल आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या आयुक्तांच्या विरोधातील अवमानाची कारवाई थांबण्यास नकार दिला आहे. याशिवाय राज्याच्या व्याजमाफी देण्याच्या अधिकारालाही चुनौती दिली आहे.

आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयाने भारतीय किसान मजदूर संघटनेच्या याचिकेवर सुनावणी करताना उत्तरप्रदेश सरकारला नोटीस पाठवली आहे. या याचिकेद्वारे याचिकाकर्त्यांनी १४ दिवसांच्या आत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांना त्या रकमेवर व्याज माफ करण्याच्या राज्य सरकारला अधिकाराला चुनौती दिली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना अवमानेच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार देत योगी सरकारला झटका दिला आहे.

दरम्यान, "ऊस थकबाकीवरील व्याज: योगी सरकार हाजीर हो...- अलाहाबाद हायकोर्ट" या शीर्षकाखाली कृषिकिंगने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात वृत्त प्रकाशित केले होते. बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा. http://bit.ly/2EHznvSसंबंधित बातम्या