शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारी प्रश्नी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा- राजू शेट्टी
03 January 10:51

शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारी प्रश्नी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा- राजू शेट्टी


शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारी प्रश्नी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा- राजू शेट्टी

कृषिकिंग, नवी दिल्ली: देशातील शेतकरी आत्महत्येची २०१५ पासूनची आकडेवारी उपलब्ध नसल्याच्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) माहितीमुळे नाराज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. तसेच त्यांनी सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोपही केला आहे.

राजू शेट्टी यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की "शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी मागितल्यानंतर "एनसीआरबी'ने असमर्थता व्यक्त करणे हा सरकारचा बेजबाबदारपणा आहे. सर्व जन्म-मृत्यूंची नोंद ठेवणे स्थानिक प्रशासकीय यंत्रणेसाठी तसेच गुन्ह्यांची नोंद ठेवणे "एनसीआरबी'साठी बंधनकारक आहे. यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचीही नोंद ठेवली जाणे अपेक्षित आहे. असे असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी उपलब्ध नसल्याचे सांगणे म्हणजे अशा आत्महत्या थांबल्या आहेत की सरकारला या आत्महत्यांची चिंता नाही? असा प्रश्‍न शेट्टी यांनी केला आहे.

आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीसाठी तातडीने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी जमा करावी, असे आदेश पंतप्रधानांनी सरकारी यंत्रणेला द्यावे, अशीही मागणीही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.संबंधित बातम्या