उत्तरप्रदेशातील कारखान्यांकडे मागील हंगामातील १८७५ कोटींची थकबाकी
03 January 08:30

उत्तरप्रदेशातील कारखान्यांकडे मागील हंगामातील १८७५ कोटींची थकबाकी


उत्तरप्रदेशातील कारखान्यांकडे मागील हंगामातील १८७५ कोटींची थकबाकी

कृषिकिंग, लखनऊ: चालू गाळप हंगाम सुरु होऊन तीन महिने झाल्यानंतरही उत्तरप्रदेशातील साखर कारखान्यांकडे मागील हंगामातील १८७५ कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. याशिवाय चालू हंगामातील गाळप अत्यंत धीम्या पद्धतीने सुरु असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. वेळेवर शेतं रिकामी न झाल्याने शेतकऱ्यांना गहू पेरणीसाठी उशीर होत आहे.

यूपी शुगर मिल्स एसोसिएशनच्या (यूपीएसएमए) माहितीनुसार, २०१७-१८ च्या गाळप हंगामातील शेतकऱ्यांची १८७५ कोटींची थकबाकी कारखान्यांकडे शिल्लक आहे. तर चालू हंगामात आतापर्यंत राज्यातील कारखान्यांनी ९ हजार ३६४ कोटींचा ऊस खरेदी केला आहे. यामध्येही साखर कारखान्यांकडून आतापर्यंत केवळ २५९४ कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.

याशिवाय उत्तरप्रदेशात चालू हंगामात आतापर्यंत ३२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. जे मागील वर्षीच्या हंगामात याच कालावधीत ३४.४२ लाख टन इतके नोंदवले गेले होते. चालू हंगामात उत्तरप्रदेशातील कारखान्यांनी २९३३ क्विंटल उसाचे गाळप केले आहे. मागील वर्षीच्या हंगामात याच कालावधीत ३ हजार ३९१ टन उसाचे गाळप झाले होते. राज्यात सध्या ११७ कारखान्यांचे गाळप सुरु असून, त्याद्वारे १०.१५ टक्क्यांचा उतारा मिळत आहे.टॅग्स

संबंधित बातम्या